एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दाभोलकर हत्या : मीडियाला माहिती देऊ नका, हायकोर्टाने ATS प्रमुखांना सुनावलं!
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या त्याप्रकरणी ठोस माहिती हाती आली असून, सीबीआय 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करणार आहे.
मुंबई : कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघडकीस आणू नका, अशी तंबी मुंबई हायकोर्टाने एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येसंदर्भातील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने एटीएसप्रमुखांना सुनावलं.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या त्याप्रकरणी ठोस माहिती हाती आली असून, सीबीआय 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करणार आहे. अशी माहीती सीबीआयचे वकील अनिल सिंग यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
राज्य सरकारच्या या माहितीनंतर न्यायालयाने तपासयंत्रणांना फैलावर घेतले. आरोपपत्र दाखल होईपर्यंत सध्या गाजत असलेल्या नालासोपारा शस्त्रसाठाचा प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथक आणि त्याचे प्रमुख असलेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांनी, 'कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघडकीस आणू नका'. अशी तंबी हायकोर्टानं दिलीय.
कोल्हापूर येथे 2015 साली पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर दाभोळकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी 2013 साली हत्या केली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या हत्याकांडांच्या आरोपात पकडण्यात आलेल्या सात आरोपींना सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. अशी माहिती देत सीबीआय आणि एसआयटीने आपल्या तपासाचा प्रगती अहवाल हायकोर्टाला सादर केला. हायकोर्टानं या खटल्याची सुनावणी 22 नोव्हेबरपर्यंत तहकूब केलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement