एक्स्प्लोर

दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई लॉकडाऊनमुळे सापडली, मातृदिनाच्या पूर्वसंध्येला मायलेकाची भेट!

लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरसोय झाली असली तर या लॉकडाऊनमुळे मायलेकाची भेट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई सापडली. 'मदर्स डे'च्या पूर्वसंध्येला आई आणि मुलाची भेट घडली.

डोंबिवली : स्मृतिभ्रंश झाल्याने दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई लॉकडाऊनमुळे सापडल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. विशेष म्हणजे या आईची मातृदिनाच्या पूर्वसंध्येलाच तिच्या मुलाशी भेट झाली. सामाजिक कार्यकर्त्यांची प्रयत्न आणि मनसे आमदार राजू पाटील यांचं पाठबळ मिळाल्याने माय-लेकाची भेट झाली.

लॉकडाऊनच्या काळात डोंबिवलीच्या पलावा जंक्शन परिसरात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते समीर कोंडाळकर, हसन खान आणि भास्कर गांगुर्डे हे धान्यवाटप करत होते. त्यावेळी एक वृद्ध महिला त्यांच्या निदर्शनास आली. ही महिला वागण्या-बोलण्यावरुन चांगल्या घरातली वाटत असल्याने कार्यकर्त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी तिचा स्मृतिभ्रंश झाल्याचं लक्षात आल्याने, त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना ही बाब सांगितली. त्यावेळी त्यांनी तिला एका वृद्धाश्रमात पाठवलं, मात्र लॉकडाऊनमुळे तिथे तिला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते हसन खान यांनी या महिलेला स्वतःच्या घरी नेलं. तिच्याशी बोलताना तिने स्वतःचं नाव हर्षा ठक्कर आणि मुलाचं नाव तेजस ठक्कर असल्याचं तसंच आपण पुण्यात राहात असल्याचं सांगितलं. इतक्या माहितीवरुन पलावा सिटीतील रहिवाशांनी तिच्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली.

या महिलेचा मुलगा तेजस ठक्कर पुण्याला आयटी कंपनीत काम करत होता. या माहितीच्या आधारे फेसबुक प्रोफाईल शोधून पलावाच्या रहिवाशांनी तेजस ठक्कर यांच्याशी संपर्क साधला. आईचा फोटो पाठवला. त्यावेळी ही आपलीच आई असून दोन वर्षांपूर्वी हरवल्याचं तेजस यांनी सांगितलं. तसंच आपण सध्या गुजरातच्या बडोद्याला राहात असल्याचं सांगत आईला घ्यायला यायची तयारीही त्यांनी दर्शवली, मात्र अडथळा होता तो लॉकडाऊनचा.

या काळात हसन शेख हे दररोज तेजस आणि त्याच्या आईचं व्हिडीओ कॉलवर बोलणं करुन देत होते. तर दुसरीकडे डोंबिवलीचे मानपाडा पोलीस आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे ट्रॅव्हल पाससाठी प्रयत्न करत होते. अखेर गुजरात पोलिसांनी परवानगी दिल्यावर 8 मे रोजी तेजस ठक्कर डोंबिवलीत दाखल झाले आणि मातृदिनाच्या आदल्या दिवशीच दोन वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या आईची आणि मुलाची भेट झाली.

आई पुन्हा भेटेल ही आशा सोडून दिलेल्या तेजसला पलावा सिटीच्या जागरुक नागरिकांमुळे त्याची आई परत मिळाली, आणि अखेर सर्वांचा निरोप घेत आणि आभार मानत ही मायलेकाची जोडी गुजरातकडे रवाना झाली ती यंदाचा मातृदिन आयुष्यभरासाठी लक्षात ठेवत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेतUddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : ठाकरे-फडणवीसांमध्ये ताणलेले संबंध सुरळीत होतील?Special Report on Shivsena UBT vs Congress :सावरकरांवरुन सल्ला, ठाकरेंचा मार्ग एकला?शिवसेना तरेल का?Special Report Priyanka Gandhi Bag:संसदेत 'बॅग पॉलिटिक्स' प्रियांका गांधींच्या बॅगवरुन चर्चा रगंली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget