मुंबईची दिल्ली होतेय का? दिवाळीतील आतषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील प्रदूषणात वाढ
Pollution : हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना महामारी आटोक्यात आली असली, तरी पावसाळय़ापासून दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
Air Pollution : दिवाळी म्हंटलं की दिव्यांची रोषणाई आणि आतिषबाजीचा सण… मात्र, ह्याच आतिशबाजीमुळे मुंबईची दिल्ली होतेय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सव्वा कोटींहून अधिकचे फटके फोडण्यात आलेत. अशात फटाक्यांच्या आतिषबाजीचा परिणाम मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्तेवर झालाय. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात प्रदूषणात भर पडल्यचं समोर आले आहे. दिवाळीमध्ये आतषबाजी केली जाते पण याच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहरगावांमध्येही वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘सफर’ या संस्थेने नोंदविले आहे.
मागच्या वर्षी दिवाळीत पाऊस होताना बघायला मिळाला. त्यामुळे प्रदूषणात अधिक भर पडली नाही. मात्र, ह्या वर्षी नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला जात 300 च्या जवळ पोहोचला आहे. त्यासोबतच मुंबईतील बीकेसी, मलाड आणि माझगावमधील हवा गुणवत्ता स्तर देखील वाईट स्थितीत पोहचला आहे. पुण्यातील कोथरुड आणि भोसरी या भागतही तशीच काहीशी परिस्थिती होती. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई आणि पुण्यासारखी शहरांची दिल्लीसारखी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
लक्ष्मीपूजनादिवशी आणि त्यानंतर काही वेळ काय होती परिस्थिती?
मुंबईतील सरासरी एक्यूआय 145 वर होता, त्यात पीएम 2.5 प्रदुषकाची मात्रा अधिक होती.
नवी मुंबईतील एक्यूआय तर थेट 300 पार बघायला मिळाला.
पुण्यातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. भोसरीत एक्यूआय 316 , कोथरुडमध्ये 302, शिवाजीनगर 228 पर्यंत गेला होता.
हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना महामारी आटोक्यात आली असली, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्याच्या हवेमुळे पुन्हा एकदा सर्दी-खोकल्याची साथ वाढण्याची भीती आहे. हवेची गुणवत्ता पातळी खालावल्यास श्वास घेण्यास अडचणी, दम लागण्यासारखे प्रकार होऊ शकतात.
वाईट पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम
50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक
101 ते 200 एक्यूआय - मध्यम
201 ते 300 एक्यूआय - खराब
301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब
401 ते 500 एक्यूआय - गंभीर
मागील दोन दिवसात राज्यातील शहरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक कसा होता?
मुंबई - 221 एक्यूआय
पुणे - 122 एक्यूआय
अमरावती - 150 एक्यूआय
औरंगाबाद - 253 एक्यूआय
चंद्रपूर - 246 एक्यूआय
कल्याण - 163 एक्यूआय
नागपूर - 198 एक्यूआय
नाशिक - 143 एक्यूआय
ठाणे - 192 एक्यूआय
दिवसेंदिवस वायु प्रदूषणात मुंबई आणि आजूबाजूच्या परिस्थितीतही वाढ होत आहे. दुसरीकडे, खेळती हवा असलेल्या पुण्यातदेखील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषित झाली आहे. शहरांमधील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात मुंबईची दिल्ली होण्याआधी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही आतषबाजी करताना मर्यादा पाळायला हव्यात. दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी टाळायला हवी.