मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणखी एक जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.  त्याच ईमेल आयडीवरुन पुन्हा एकदा धमकीचा मेला आला आहे. यावेळी त्या व्यक्तीने अंबानींकडे 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मागील ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून 200 कोटी रुपये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


उद्योगपती मुकेश अंबानी यांना 27 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवारी धमकीचा मेल आला होता. या मेलमधून मुकेश अंबानी यांना 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकी अंबानींना देण्यात आली होती. 


आताच्या मेलमध्ये काय म्हटलं?


आधीच्या मेलला प्रतिसाद न दिल्यामुळे मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा मेल पाठण्यात आलाय. त्यातच आता त्यांच्या 200 कोटींची मागणी करण्यात आलीये. या मेलमध्ये म्हटलयं की, “तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता 20 कोटी नाही तर 200 कोटी द्यावे लागतील. अन्यथा तुम्ही तुमच्या डेथ वॉरंटवर सही करत आहात.' 


पोलिसांत तक्रार दाखल


धमकीचा पुन्हा एकदा मेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या  सुरक्षा प्रभारीने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम  387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. त्यामुळे हा एक मानसिक रुग्ण आहे की कोणी दुसरी व्यक्ती हे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट होईल. 


या आधीही आली होती मुकेश अंबानी यांना धमकी


यापूर्वी सुद्धा अनेकदा अंबानी कुटुंबांना असे धमकी  कॉल्स आणि ईमेल आलेत. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या  नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. 


त्यानंतर ऑगस्ट 2022 ला देखील  मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आतंकवादी अफजल गुरु आहे असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी आणि त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या आरोपीने रिलायन्स रुग्णालयात नऊ वेळा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर विष्णू बिंदू भूमिक या 56 वर्षीय आरोपीला बोरीवलीमधून ताब्यात घेण्यात आलं. 


हेही वाचा : 


उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, 20 कोटींची मागणी