Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) कोरोनारुग्ण संख्या हळूहळू कमी होत असून आज 255 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) 20 ने अधिक आहे, कारण मंगळवारी 235 नव्या बाधितांचीच नोंद झाली होती. पण आजही मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू न झाल्याने मुंबईकरांना आजही दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही आज कमी झाला असून 0.03% टक्के इतका झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 115 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 255 रुग्णांपैकी 23 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 436 बेड्सपैकी केवळ 936 बेड वापरात आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2205 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 275 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1930 इतका होता.
राज्यात 2 हजार 748 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या किंचीत वाढली आहे. याशिवाय 41 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र
- 12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार Corbevax? DCGI च्या कमिटीने केली शिफारस
- Covid19 Vaccine : फायझर लसीच्या पाच वर्षाखालील मुलांवरील वापरासाठी प्रतिक्षा, मंजुरीसाठी अधिक माहिती गरजेची : FDA
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha