मुंबई : देशभरासह महाराष्ट्रातही कोरोना (Coronavirus) रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील (Mumbai) कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील शाळा (School) प्रत्यक्ष सुरू ठेवायच्या की नाही? याबाबतचा निर्णय आज होणार आहे. आज सायंकाळी मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. याच बैठकीत शाळांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती BMC चे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
"15 ते 18 वर्षांतील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. पात्र मुलांना सध्या कोव्हॅक्सीन देण्यात येत असून दोन डोस मधील अंतर 28 दिवसांचे असेल. मुंबईत 9 लाखांहून अधिक मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. लसीकरणासाठी मुंबईत 9 जम्बो कोविड सेंटर सुरू केली आहेत. पहिल्या एका आठवड्यात मुलांवर काही परिणाम होत आहेत का? याचे निरीक्षण करू. त्यानंतर लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मुलांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त काकाणी यांनी दिली.
आयुक्त काकाणी म्हणाले, "लसीकरणानंतर आम्ही सतत निरीक्षण करत राहू, मुंबईतील पात्र 9 लाखांपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण 28 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा विचार करत आहोत. कोरोना रूग्णांच्या संखेत जशी वाढ होईल तसे आम्ही कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करत आहोत. मुंबईत 90 टक्के बेड अद्याप शिल्लक आहेत. आपल्याला सतर्क राहावे लागेल आणि कोरोना नियमांचे पालन करावे लागेल."
"मुंबईत मुलांच्या लसीकरणासाठी 9 जम्बो कोविड सेंटर सुरू केली आहेत. मुलांना सध्या कोव्हॅक्सीन देण्यात येत असून दोन डोस मधील अंतर 28 दिवसांचे असेल. लसीकरण व्यवस्थीत चाललं तर पुढच्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन आणि शाळांशी चर्चा करू. सर्व लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोसची व्यवस्था केल्यामुळे लसीकरणाला थोडासा वेळ लागू शकतो, अशी माहिती आयुक्त काकाणी यांनी दिली.
तीन लाख डोस उपलब्ध
सध्या तीन लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. दर आठवड्याला किंवा तीन-चार दिवसांनी आपल्याला लसीचा साठा उपलब्ध होत असतो. त्यामुळे लस साठ्याची अडचण येणार नाही. आधार कार्ड आणि शाळेच्या ओळखपत्राचा वापर करून लसीकरण करता येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
BMC कडून सर्व तयारी पूर्ण
सध्या मुंबईत रोज आठ हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आजही तेवढेच रूग्ण सापडण्याची शक्यता आहे. करोनाचे रूग्ण वाढले तरी त्याविरोधाक लढण्यासाठी BMC ची पूर्ण तयारी झाली आहे. 30 हजारांपेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. त्याबरोबरच औषधे आणि वेंटीलेटरही उपलब्ध आहेत, असे कांकणी यांनी सांगितले.
Suresh Kakani on Mumbai School : मुंबईतील शाळा सुरू ठेवायच्या की नाही यावर आज होणार निर्णय
महत्वाच्या बातम्या
- corona Cases In india : देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद, ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही वाढ
- John Abraham : बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेता जॉन अब्राहमला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह
- Corona Vaccination For Children : मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी; 3 जानेवारीपासून लसीकरण