John Abraham : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल (Priya Runchal) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल जॉनने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
जॉनची पोस्ट
जॉननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'तीन दिवसापूर्वी मी एका व्याक्तीच्या संपर्कात आलो होते, मला नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. माझी पत्नी प्रिया आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच क्वारंटाईन झालो आहोत. दोघांनीही लस घेतली आहे. आम्हाला सैम्य लक्षणं आहेत. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्कचा वापर करा. '
लवकरच जॉन अब्राहम सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी 'पठान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात जॉनसोबतच दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हे कलाकार देखील दिसणार आहे.
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
संबंधित बातम्या
AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?
The Kapil Sharma Show : भारती, कृष्णा अन् अर्चना; कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन माहितेय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha