corona Cases In india : ओमायक्रॉनचा (Omicron ) धोका वाढत असतानाच कोरोना (Corona ) रूग्णांच्या संखेत झपाट्याने वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई, पश्चिम बंगाल आणि तर काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संखेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 582 झाली आहे. 


कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रूग्णांचेही प्रमाण चांगले आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 846 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 42 लाख 95 हजार 407 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4 लाख 81 हजार 893 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशभरात आजपर्यंत 145 कोटींपेक्षा जास्त कोलांचे लसीकरण झाले आहे. 





ओमायक्रॉनचा धोका कायम
कोरोना रूग्ण वाढत असताना दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशभरात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या 1700 वर पोहोचली आहे. यातील 639 लोक ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. 


महाराष्ट्रात झपाट्याने वाढतोय कोरोना
महाराष्ट्रात परत एकदा अत्यंत झपाट्याने कोरोना रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे. रविवारी 11 हजार 877  कोरोना रूग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. शनिवारच्या आकडेवारीपेक्षा ही रूग्णसंख्या 2 हजार 707  ने अधिक आहे. तर ओमायक्रॉनचे 50 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रविवारी आढळलेल्या रूग्णांमधील 7 हजार 792 रूग्ण फक्त मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतही कोरोना रूग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे.


महत्वाच्या बातम्या