मुंबई : राज्यात आज 1352 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 33 हजार 681 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाचे नवीन 2933 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 77 हजार 793 इतका झाला आहे. पैकी सध्या 41 हजार 393 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना चाचणीच्या आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 10 हजार 176 नमुन्यांपैकी 77 हजार 793 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 60 हजार 303 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 73 हजार 49 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 623 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.


कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 123 कोरोनाबाधित रुग्णांच्या आज मृत्यू झालाय.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू

  • ठाणे जिल्हा - 68 (मुंबई 48, ठाणे शहर 8, नवी मुंबई 6, पनवेल 1, रायगड 3, वसई विरार 1

  • नाशिक - 25 ( नाशिक 3, जळगाव 21, धुळे 1)

  • पुणे - 16 (पुणे 9, सोलापूर 7)

  • औरंगाबाद 8 (औरंगाबाद 5, जालना -1, परभणी - 2)

  • लातूर 3 (लातूर– 1, उस्मानाबाद -1, नांदेड -1.

  • अकोला 3 (वाशिम – 2, यवतमाळ – 1.


 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 85 पुरुष तर 38 मिहला आहेत. आज नोंद झालेल्या 123 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 71 जण आहेत तर 44 जण हे वय वर्ष 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर आठजण 40 वर्षाखालील आहे. या 123 जणांपैकी 92 जणांमध्ये (75%) मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2710 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 30 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू 30 एप्रिल ते 1 जून या कालावधीतील आहेत.

Coronavirus | पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 
महाराष्ट्रात कोरोनाचं जाळं जितक्या वेगाने पसरतंय त्याच वेगाने आता हळूहळू रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही काहीसं वाढताना दिसतंय. देशभरात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे राज्य सरकार राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने अनलॉकची घोषणा करत हॉटेल्स आणि लसूनला परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्यात केवळ नॉन कंटेन्मेंट झोनमध्येच यासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातही हळूहळू काही उद्योग अनलॉक होत आहेत मात्र नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील ही अपेक्षा आहे.

COVID-19 | Ashok Chavan | काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून डिस्चार्ज