मुंबई : कोरोनाच्या संकटाचा फटका शेअर बाजारालाही बसताना दिसत आहे. सेन्सेक्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. बाजार सुरु झाल्यानंतर काही वेळातच शेअर बाजारात लोअर सर्किट लावण्यात आलं आणि ट्रेडिंग थांबवण्यात आलं आहे. सकाळी 10.57 वाजेपर्यंतपर्यंत ट्रेडिंग थांबवण्यात आलं आहे.


सोमवारी शेअर बाजार खुला झाला त्यावेळी मोठी घसरण पाहायला मिळाली. पहिल्या दहा मिनिटातच सेन्सेक्स जवळपास 2600 अंकाची घसरून 270 हजार 368 अंकांवर उघडला. तर निफ्टीही 792 अंकांची घसरून 7953 अंकावर उघडला.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करून पैसे काढून घेत आहेत, त्याचा परिणाम बाजारावर होत आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा शेअर बाजाराला लोअर सर्किट लावून ट्रेडिंग थांबवण्याची वेळ आली आहे.


मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी


 महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 59 वर्षीय मृत व्यक्ती फिलिपिन्स येथून आली होती. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई - 38

  • पुणे मनपा - 16

  • पिंपरी चिंचवड मनपा - 12

  • नागपूर- 4

  • यवतमाळ - 4

  • नवी मुंबई - 4

  • कल्याण - 4

  • अहमदनगर - 2

  • पनवेल - 1

  • ठाणे - 1

  • उल्हासनगर - 1

  • औरंगाबाद - 1

  • रत्नागिरी - 1




संबंधित बातम्या