कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रामध्ये फूटपाथ, विविध मार्केट, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट, फिश मार्केट, गर्दीची ठिकाणे आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार प्रत्येक प्रभाग स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून 10 ट्रॅक्टर्स, 80 स्प्रेईंग मशीन्स,अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि जवळपास 140 कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात लॉकडाऊन
कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. लोकल ट्रेनसह इंटरसिटी ट्रेन, मेट्रो, एसटी बस आणि खासगी बस इत्यादी सेवा बंद करण्यात आल आल्या आहे. सोबतच मुंबईत आंतरराष्ट्रीय उड्डाणांची लॅण्डिंगवरही बंदी घातली आहे.
परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. किराणा, दूध, भाजी इत्यादी दुकांनं सुरु राहतील. याशिवाय शेअर बाजार, बँका सुरु आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल.
महाराष्ट्रात आतापर्यंत किती कोरोनाबाधित?
देशात आतापर्यंत 396 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात आतापर्यंत 74 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यापैकी पाच जणांवर उपचार होऊन ते कोरोना निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तर मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे.