मुंबई : कोरोना काळात केंद्र सरकार अन्याय करत असल्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आरोप केले आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही केंद्राच्या भूमिकेवर पुन्हा एकदा मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार नुसती घोषणा करतं पण राज्याला गोष्टी देत नाही. राज्याची अडवणूक सुरूच आहे यावरून नाराजीचा सूर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. 


केंद्र सरकारने 24 एप्रिल ते 30 एप्रिलसाठी 4 लाख 34 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा केली. मात्र राज्याला आजपर्यंत केवळ 2 लाख 24 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळाले. उरलेल्या दोन दिवसात केंद्र सरकार 2 लाख 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार का? असा सवाल आजच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. 


ज्या कंपनीकडे रेमडेसिवीर साठा आहे त्यांनी तो राज्याला द्यावा म्हणून सरकारने प्रयत्न केले. पण ते रेमडेसिवीर इतर राज्यासाठी आहे, असं केंद्र सरकारने राज्याला सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकार लस असो की रेमडेसिवीर असो घोषणा करूनही राज्याचा वाटा राज्याला देत नसल्याबाबत आजच्या मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या