एक्स्प्लोर

Coronavirus | पालघरमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे 10 नवे रुग्ण, दोन शिकाऊ डॉक्टरांचा समावेश

पालघरमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे दहा नवीन रुग्ण आढळले आहेत. तीन वर्षीय मुलीच्या संपर्कात आलेल्या दोन शिकाऊ डॉक्टरांसह सात जणांना कोरोनाची लागण झाली. तर सफाळे भागातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

पालघर : पालघर जिल्हा ग्रामीणसाठी चिंता वाढवणारी बाब समोर आली असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. पण काल (15 एप्रिल) रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालघर तालुक्यातील आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा आणि येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तिच्या संपर्कात आलेल्या 82 जणांचे रिपोर्ट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाली. काटाळे येथील वीट भट्टी संदर्भात पाच नवीन रुग्ण आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (इंटर्न) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. तर सफाळे भागातील तीन जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आहे. मात्र हे रुग्ण मुलीच्या संपर्कातील नाही.

Coronavirus | डहाणूमधील तीन वर्षीय चिमुकलीची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

डहाणू येथे लहान मुलीला कोरोनाची लागण झाल्याने पालघर तालुक्यातील काटाळे, लोवरे, वांदिवली-खरशेत या गावांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या मार्फत घरोघरी पाहणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान कासा येथील उपविभागीय रुग्णालय सील करण्यात येत आहे.

याखेरीज उसरणी गावातील दोन तर सफाळे डोंगरी येथे श्वसनाचा विकार असणाऱ्या रुग्णाला करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानकपणे एकाच दिवसात 10 रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागासाठी प्रशासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील 42 नागरिकांचे नव्याने विलगीकरण करण्यात आले आहे.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Maharashtra Legislative Council Video : 'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?
मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BEST bus Shevpuri: मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Embed widget