Corona Update | कोरोनाशी लढण्यात पुरुषांपेक्षा महिला सरस
दरम्यान, सर्व वयोगटातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण सारखंच आहे. महिलांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज् जास्त तयार होणं म्हणजे कोरोनाशी लढण्याची त्यांची प्ररतिकार शक्ती जास्त असणं.
![Corona Update | कोरोनाशी लढण्यात पुरुषांपेक्षा महिला सरस Corona update, woman better then men to fight corona Corona Update | कोरोनाशी लढण्यात पुरुषांपेक्षा महिला सरस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/29004836/BMC.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोनाशी लढण्यात महिला या पुरुषांपेक्षा कांकणभर अधिक सरस असल्याचं सिद्ध झालं आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सिरो सर्व्हेच्या पहिल्या फेरीच्या निष्कर्षातून ही बाब समोर आली आहे. जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असताना मुंबईतील महिलांनी पुरुषांच्या तुलनेत कोरोनाला अधिक वेगानं मात दिली आहे. महिलांपेक्षा पुरुषांना कोरोना होण्याची संख्या जास्त आहेच. शिवाय, मुंबईकर महिलांची रोग प्रतिकारशक्ती पुरुषांपेक्षा जास्त असल्याचंही समोर आले आहे.
टीआयएफआर, निती आयोग आणि पालिकेने मिळून हा सिरो सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अँटीबॉडीज अधिक असल्याचं निरीक्षणातून समोर आलं आहे. मुंबईत 45 टक्के महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पुरुषांमध्ये हे प्रमाण 55 टक्के इतकं आहे. सर्व्हेत 59.3 टक्के म्हणजेच 2 हजार 297 महिलांमध्ये अँटीबॉडीज् आढळल्या 1,937 पुरुषांमध्ये 53.2 टक्के अँटीबाडीज् तयार झाल्या. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अँटीबॉडीज जास्त आढळल्या.
शिवाय, महिलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे आणि त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाण ही अगदी कमी आहे. दरम्यान, सर्व वयोगटातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण सारखंच आहे. महिलांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज् जास्त तयार होणं म्हणजे कोरोनाशी लढण्याची त्यांची प्ररतिकार शक्ती जास्त असणं. यामागेही काही वैद्यकीय कारणं आहेत. वैद्यकिय आणि जनुकिय कारणांसोबतच आणखीही महिलांमधील काही महत्वाच्या सवयी आहेत. ज्यामुळे महिलांना कोरोनाचा संसर्ग पुरुषांच्या तुलनेत कमी प्रमाणात झाला आणि त्यांचा मृत्युदरही कमी राहिला. यामध्ये महिलांच्या स्वच्छतेच्या सवयी, लॉकडाऊन मध्यये घराबाहेर न पडणं, पुरुषांच्या तुलनेत कमी व्ययसनाधिनता या बाबी महत्वाच्या ठरल्या.
मुंबईतल्या सिरो सर्व्हेनं महिला प्ररतिकारशक्तीबाबत सरस असल्याचं सिद्ध केलं आहे. पण कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही .म्हणून निर्धास्त होण्याचं कारण नाहीच. महिलांनी ही प्रतिकारशक्ती टिकवणं आणि वाढवणं गरजेचं आहे...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)