एक्स्प्लोर

Coronavirus | मुंबईत कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू; राज्यात 156 कोरोनाबाधित

मुंबईतील एका कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे.

मुंबई : आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरांचा संशयित कोरोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. शहरातील हिंदुजा रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

आज मुंबईत एका 85 वर्षीय डॉक्टरचा संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कोरोनाचे निदान खासगी प्रयोगशाळेत झाल्याने त्यासंदर्भात अद्याप अधिकॉत माहिती मिळालेली नाही. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. मात्र, या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यामुळे नक्की मृत्यू कशामुळे झाला याची पुष्टी झालेली नाही.

अनाधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात एकाच दिवसात 12 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज कोल्हापुरात दोन नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले. राज्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. यात मुंबईतील लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन जर चुकून झालं तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आज मुंबईत सर्वाधिक 51 कोरोना रुग्णांची संख्या आहे. दरम्यान, देशातही हा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाले आहे.

केरळमध्ये होम कॉरंटाईन असलेल्या IAS अधिकाऱ्याचे पलायन केल्याने निलंबन

अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेतला आहे. आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही गोष्टी बघून मला धक्काच बसला. लोक जिथे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Coronavirus Update | सांगलीत सौदी अरेबियातून परतलेल्या चार जणांमुळे इतरांना लागण

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget