नवी मुंबई : वाशी येथे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. यानंतर 15 दिवस महिला आणि बांळावर उपचार करून त्यांना आज घरी सोडण्यात आले. रूग्णालयातून घराकडे जाताना डॉक्टर, नर्स , वॉर्डबॉय यांनी टाळ्या वाजवून सदर महिला आणि बाळाला निरोप दिला. पाच एप्रिलला घणसोली येथील गर्भवती महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर तिला मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवती असतानाच कोरोना झाला असल्याने महिलेच्या घरचे कमालीचे चिंतेत होते. मात्र, मनपा डॉक्टरांनी महिलेची यशस्वी प्रसूती करीत जन्मलेल्या बाळाला कोरोना होणार नाही याची काळजी घेतली.


आईची दुसऱ्यांदा आणि बाळाची पाचव्या दिवशी टेस्ट केली असता दोघे निगेटीव्ह आल्यानंतर कुटुंबाच्या जीवात जीव आला. सामान्यतः हृदय हे डाव्या बाजूला असते. मात्र, महिलेचे हृदय हे उजव्या बाजूला असल्याने शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. मनपा डॉक्टरांनी यशस्वीरित्या प्रसुती करीत आई आणि मुलीचे कोरोनापासून संरक्षण करून जीव वाचविल्याने वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. त्यामुळे या दोघांना डिस्चार्ज देताना आज रुग्णालयातील डॉक्टर, नर्स , वॉर्डबॉय यांनी टाळ्या वाजवत मायलेकीचे स्वागत केले.


कोरोनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नये, डॉक्टरांना दाखवा : राजेश टोपे


औरंगाबादमध्येही अशीच घटना
कोरोनाची बाधा असलेल्या महिलेची यशस्वी प्रसुती औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाळाचे जन्म झाल्यानंतर त्याचे स्वॅबचे नमुने घेतले होत. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही जगातली सहावी, तर देशातली तिसरी तर राज्यातील दुसरी घटना ठरली आहे. मुंबईतून रुग्णवाहिका करून शहरात येताना तीस वर्षीय गर्भवतीला आणि 17 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया पद्धतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी केली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला.


औरंगाबादेत कोरोना बाधित महिलेची प्रसुती यशस्वी; गोंडस मुलीला जन्म 


कोल्हापुरात बियाणं, शेती अवजारांची दुकानं सुरू, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी, शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन