औरंगाबाद : कोरोनाची बाधा असलेल्या महिलेची यशस्वी प्रसुती औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाळाचे जन्म झाल्यानंतर त्याचे स्वॅबचे नमुने घेतले असून कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आली आहे. ही जगातली पाचवी, तर देशातली दुसरी घटना ठरली आहे. मुंबईतून रुग्णवाहिका करून शहरात येताना तीस वर्षीय गर्भवतीला आणि 17 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते.


या नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया पद्धतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी केली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला. कोरोनाच्या संकटातील जगातील ही पाचवी प्रसूती ठरली. यापूर्वी चीन, लंडन, ऑस्ट्रोलिया आणि मुंबईत अशी प्रसूती करण्यात आली होती. कोरोना झालेली महिलेचीही प्रकृती उत्तर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बाळाचे वजन सुमारे सव्वा तीन किलो भरले असून, त्या नवजात मुलीचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांचे स्वॅबचे प्रत्येकी तीन नमुनेही घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.


'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा


औरंगाबादमध्ये महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 28 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दोघांचा यात मृत्यू झालाय. राज्यातील पहिला कोरोनामुक्त रुग्ण औरंगाबादमध्येच झाला होता. विदेशातून आलेल्या एका प्राध्यापिकेला कोरोनाची लागण झाली होती. योग्य उपचारानंतर त्या कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.


Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले!


राज्यात कोरोना संसर्ग होण्याचा वेग मंदावला
सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कोरोना बाधितांच्या संक्रमणाचा वेग राज्याती कमी झाला आहे. काल म्हणजे शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधीत 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. तर, दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3320 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, कालच्या आकडेवारीतून कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांना लॉकडाऊन आणि नियमांचे योग्य पालन केल्यास हा वेग आणखी मंदावेल असल्याचे टोपे म्हणाले.


Aurangabad Liquor Shop Theft | तळीरामांचा उद्रेक, औरंगाबादमध्ये 24 तासात दोन दारुची दुकानं फोडली