(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय; आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या बेस्ट वाहतूक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी बेस्ट कोविड रॅपिड अॅक्शन टिम तयार करण्यात आली आहे.
मुंबई : शहरात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पैकी केवळ 4 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. परिणामी हा संसर्ग रोखण्यासाठी `बेस्ट कोविड रॅपिड अॅक्शन टिम´ तयार करण्यात आली आहे. या रॅपिड अॅक्शन टिममध्ये बेस्टच्या सर्व विभागांच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे.
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. यातून केवळ अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. मुंबई महापालिकेची बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. ही सेवा बजावत असताना आता बेस्टच्या कर्मचाऱ्यामध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत 40 हून अधिका लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पैकी तीन जणांचा यात बळी गेला. तर, चारजण कोरोनामुक्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा संसर्ग रोखण्यासाठी `बेस्ट कोविड रॅपिड अॅक्शन टिम´ तयार करण्यात आली आहे. या रॅपिड अॅक्शन टिममध्ये बेस्टच्या सर्व विभागांच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे. बेस्ट कर्मचारी आणि त्याचे कुटुंब यांची संपूर्ण माहिती, वैद्यकिय अहवाल वेळोवेळी या टिमकडून तपासले जाणार आहे. दरम्यान, 50 टक्के कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.
राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढला मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतचं आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्र हद्दीतील आकडा नऊ हजाराच्या जवळ पोहचला आहे. तर, 343 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, मुंबईतील बेडची क्षमता संपली असल्याने कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याच रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्याचे येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला तसे आदेश दिले आहे. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
Lockdown 3 | मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरात दारु दुकानाबाहेर मोठी गर्दी; गर्दी पांगवण्यासाठी पोलीसांचा हस्तक्षेप