एक्स्प्लोर
मुंबईतील सायनमधील झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात
मुंबई : सायन रेल्वे स्टेशनजवळील प्रेमनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या झोपडपट्टीत 50 ते 60 लोक राहत असल्याची माहिती मिळाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रेमनगर झोपडपट्टीत ज्या भागात आग लागली होती, तिथे तात्पुरत्या झोपड्या होत्या. कुठलंही बांधकाम नव्हतं. त्यामुळे मोठं नुकसानही झालं नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्लास्टिक आणि कपड्यांच्या कचऱ्याचा ढीग असल्याने आग विझवण्यात अडथळे येत होते. मात्र, अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement