एक्स्प्लोर

Eid a milad 2024 Holiday: मुंबईचं सोडा, ठाण्यासह राज्याच्या इतर भागात सोमवारी ईदची सुट्टी मिळणार की नाही?

2024 Public Holidays: मुंबई आणि उपनगरात काम करणाऱ्या नोकरदारांच्या लाँग हॉलिडेच्या प्लॅनिंगचा विचका होणार आहे. राज्य सरकारने सोमवारी असलेली ईदची सुट्टी रद्द करुन ती आता बुधवारी दिली आहे. इतर भागात जिल्हाधिकाऱ्यांवर निर्णय सोपवला.

मुंबई: अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने राज्य सरकारने मुस्लीम संघटनांच्या मागणीनुसार ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ईदची सोमवारी येणारी सुट्टी (public holidays 2024) बदलून ती बुधवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शनिवारी, रविवार, सोमवार आणि मंगळवार असा सलग सुट्ट्या डोळ्यांसमोर ठेवून फिरायला जाण्याचे किंवा आराम करण्याचे बेत आखलेल्या अनेकांचा मनसुबे उधळले गेले. खरं तर ईदची (EID A Milad 2024) सुट्टी रद्द करण्याचा हा निर्णय मुंबई आणि उपनगर परिसरासाठी घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ठाण्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून तसाच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोमवारी ईदची सुट्टी असणार की नाही, यावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

ईदची सोमवारची सुट्टी बुधवारी दिल्यास नोकरदारांना नक्की काय करावे, हे कळेनासे झाले आहे. सोमवारची सुट्टी आता बुधवारी झाल्यामुळे नोकरदारांना सोमवारी कामावर जावे लागेल, त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी सुट्टी मिळेल. राज्य शासनाने फक्त मुंबई आणि उपनगरात ईदच्या सुट्टीचा वार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टीत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या जिल्ह्यात सुट्टीत बदल न झाल्यास त्याठिकाणी सोमवारीच ईदची सुट्टी मिळेल.

ईदच्या सुट्टीत बदल का केला?

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी 'ईद मिलाद उन -नबी' निमित्त मुस्लिम बांधव राज्यात जुलूस काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात. मात्र, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी (Anant Chaturdashi 2024) असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह  इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी घेतला होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन 'ईद मिलाद उन - नबी निमित्तची शासकीय सुट्टी यंदाच्या वर्षी बुधवार, 18 सप्टेंबर रोजी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे 'भिवंडी पूर्व'चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.  अन्य मुस्लीम संघटनांनीही अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईत ईदची सोमवारची सुट्टी रद्द करुन ती बुधवारी दिली.

आणखी वाचा

मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार

आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget