एक्स्प्लोर

Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!

Coaching Class New Rules: नीट पेपरफुटीनंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कोचिंग क्लाससाठी नवी नियमावली, शिक्षकांवर काय परिणाम होणार? शिक्षक ग्रॅज्युएटच हवेत, उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंत दंड

NEET Paper leak Coaching Class: नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकारकडून खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी सरकारने महाराष्ट्र  खाजगी शिकवणी केंद्र ( नोंदणी व विनिमय ) अधिनियम 2026 च्या अंतर्गत हरकती व सूचना मागवण्यास सुरुवात केली आहे. कोचिंग क्लासेसच्या नोंदणी पासून ते शिक्षकांच्या नियुक्ती पर्यंत, जाहिराती पासून ते इंटिग्रेटेड कॉलेजच्या नियमापर्यंत प्रत्येक बाबींवर काटेकोर नियमांचा या मसुद्यात समावेश असेल. या नव्या मसुद्यानुसार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय शिकवणारा शिक्षक आता खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवू शकणार नाही. तसेच इंटिग्रेटेड कॉलेज शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. 

Coaching Class: राज्याच्या  शालेय शिक्षण विभागाने कॉर्पोरेट खाजगी कोचिंग क्लासेस वर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या मसुद्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश?


१. पदवीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेला शिक्षकाची नियुक्ती कोचिंग क्लासेसला करता येणार नाही 

२. पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चुकीची आश्वासने किंवा रँक / चांगल्या गुणांची हमी देणे कोचिंग क्लासेस ला देता येणार नाही 

३. शिकवणीची गुणवत्ता, दिल्या जाणाऱ्या सुविधा किंवा त्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले निकाल यांसंबंधी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या फसवी/भ्रामक जाहिरात प्रकाशित करणे किंवा करून घेता येणार नाही 

४. १३ वर्षांखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही 

५. ज्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता किंवा भारतीय न्याय संहिता अंतर्गत कोणताही दखलपात्र अपराध नोंदविण्यात आला आहे, अशा कोणत्याही शिक्षक अथवा व्यक्तीस नियुक्त करता येणार नाही 

६. कोणतेही खाजगी शिकवणी केंद्र शासनमान्य किंवा मान्यताप्राप्त कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरात चालविणे अनुमती नसेल.

७.  कोणत्याही मान्यताप्राप्त शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीची खाजगी शिकवणी केंद्रात नियुक्ती किंवा सेवा घेतली जाणार नाही.

८. कोणतेही शिकवणी केंद्र मान्यताप्राप्त शाळेशी कोणत्याही प्रकारचे एकात्मीकरण करणार नाही, राखणार नाही किंवा त्यात सहभागी होणार नाही.

९. खाजगी कोचिंग क्लासेस तळघरात चालवण्यास परवानगी नसणार. कोचिंग क्लासेस सर्व भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असणार 

१०. प्रत्येक शिकवणी केंद्राने विद्यार्थी तसेच अध्यापक यांना दर आठवड्याला किमान एक दिवसाची सुट्टी देणे बंधनकारक राहील. साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी किंवा परीक्षा घेण्यात येऊ नये.


११. शिकवणी केंद्रामधील अध्यापनाचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी अतिरेकाचा ठरणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत दररोजचे अध्यापन पाच तासांपेक्षा अधिक असू नये. तसेच वर्ग सकाळी अत्यंत लवकर किंवा सायंकाळी अत्यंत उशिरापर्यंत आयोजित करण्यात येऊ नयेत.

१२. प्रत्येक वर्ग अथवा तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या माहितीपत्रिका तसेच शिकवणी केंद्राच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद करण्यात यावी. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्या वर्गातील किंवा तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात येऊ नये.

१३.विद्यार्थ्यांची क्षमता व अभिरुची यांचे मूल्यमापन करण्यासाठी अभिक्षमता चाचणी (Aptitude Test) घेण्यात यावी. त्या चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांची वास्तविक क्षमता व अपेक्षित प्रगती याबाबत पालकांना वस्तुनिष्ठ माहिती देऊन पुढील शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात यावे.

१४. शिकवणी केंद्रामध्ये प्रवेश घेतल्याने वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी शिक्षण संस्था अथवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल, याची कोणतीही हमी दिली जात नाही, याची स्पष्ट माहिती विद्यार्थी व पालकांना देणे आवश्यक राहील.

NEET Classes: नोंदणी व नोंदणी प्रक्रिया संबंधी नियम 

* सर्व खाजगी शिकवणी केंद्रांसाठी या अधिनियमानुसार नोंदणी करणे आणि/किंवा नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल. शासनाने निश्चित केलेल्या तारखेनंतर नोंदणी किंवा नूतनीकरणाशिवाय कोणताही शिकवणी वर्ग कार्यरत राहू शकणार नाही.

* जर एखाद्या शिकवणी केंद्राच्या अनेक शाखा असतील, तर प्रत्येक शाखा स्वतंत्र शिकवणी केंद्र म्हणून गणली जाईल आणि प्रत्येक शाखेसाठी नोंदणी किंवा नोंदणी नूतनीकरणासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.

या अधिनियमान्वये खाजगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणीचा कालावधी तीन वर्षांचा असेल. नोंदणी प्रमाणपत्राच्या मुदतीपूर्वी किमान तीन महिने आधी नोंदणी नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक असेल.

New Rules for NEET Coaching Class: कोचिंग क्लासेस च्या फी संबंधी नियम

१. विविध अभ्यासक्रमांसाठी भरलेल्या शुल्काच्या तात्काळ रकमेबाबत किंवा अंशतः रकमेबाबत, शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या योग्य नमुन्यात तात्काळ पावती देणे बंधनकारक असेल.

२. खाजगी शिकवणी केंद्राने कोणत्याही अभ्यासक्रमासाठी निर्धारित केलेल्या शुल्कामध्ये माहितीपत्रक, नोट्स, अभ्यास साहित्य, अंतर्गत परीक्षा व इतर संबंधित बाबी समाविष्ट करेल. ठरविलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही इतर शीर्षकाखाली कोणतीही रक्कम आकारण्यास परवानगी नसेल. संबंधित अभ्यासक्रम चालू असताना ठरविलेले शुल्क वाढविता येणार नाही.

३. विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाचे पूर्ण शुल्क भरलेले असल्यास आणि तो अभ्यासक्रमाच्या मध्यात सोडत असल्यास, उर्वरित कालावधीसाठी आधी जमा केलेल्या शुल्कातून प्रमाणानुसार परतावा दहा दिवसांच्या आत दिला जाईल. 


Neet exam: या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना काय शिक्षा होणार?

१. शिक्षेमध्ये दंड किंवा शिकवणी वर्ग बंद करणे किंवा नोंदणी रद्द करणे किंवा दोन्ही बाबींचा समावेश असू शकतो.

३. जर असे सिद्ध झाले की, एखादी शाळा या अधिनियमाच्या किंवा त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या कोणत्याही तरतुदींच्या उल्लंघनात किंवा उल्लंघन चालू ठेवण्यात सक्रियपणे सामील आहे, तर अशा शाळेविरुद्ध देखील कारवाई करणे कायदेशीर असेल...अशा शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करू शकतात.

४. कोणत्याही किरकोळ उल्लंघनासाठी रुपये 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावणारे आदेश जारी करणे किरकोळ श्रेणीत येणाऱ्या उल्लंघनांची पुनरावृत्ती (वारंवारता) झाल्यास, चौकशी अधिकारी किंवा अपिलीय प्राधिकाऱ्याला १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावणारे आदेश जारी करणे

४. गंभीर उल्लंघनांच्या प्रकरणांमध्ये रुपये 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावणारे आदेश जारी करणे चौकशी अधिकारी किंवा अपिलीय प्राधिकाऱ्यासाठी कायदेशीर असेल.

५.परवाना तात्पुरता निलंबित करणे (Temporary suspension) किंवा नोंदणी कायमची रद्द करणे किंवा शिकवणी वर्ग बंद करणे किंवा कोणत्याही शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करणे यांसारखे आदेश जारी करणे देखील चौकशी अधिकारी किंवा अपिलीय प्राधिकाऱ्यासाठी अनुज्ञेय असेल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Diwali Fire Incidents : दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबई, ठाण्यात आगीचे तांडव, डोंगरीत भीषण आग, चेंबूर अन् ठाण्यातही इमारतींना पेट
दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबई, ठाण्यात आगीचे तांडव, डोंगरीत भीषण आग, चेंबूर अन् ठाण्यातही इमारतींना पेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Rupali Chakankar : कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget