“मराठा आरक्षणाबाबतच्या विषयाची घरातही चर्चा होते. आरक्षणप्रश्नी बोलण्याबाबत आपण सक्षम नसून न्यायालय आणि सरकार योग्य तो निर्णय घेईल” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांनी रविवारी मुंबईतील नेपियन्स सी रोडवरील आठवडी बाजाराला भेट दिली. यावेळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांना सध्या सुरु असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, “मराठा समाजाने इतके मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले आहेत. सरकारकडे त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. मी याबाबत बोलण्यास सक्षम नाही, पण सरकार सकारात्मक आहे”
मेगाभरती स्थगित, नोव्हेंबरपर्यंत आरक्षण प्रक्रिया: मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असून, तोपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल. तसेच, प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता काय काय केले जात आहे, याची सविस्तर माहिती दिली.
संबंधित बातम्या
मेगाभरती स्थगित, नोव्हेंबरपर्यंत आरक्षण प्रक्रिया: मुख्यमंत्री