एक्स्प्लोर
या युगावर देशाचा विश्वास : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आजच्या नवयुगावर देशाचा विश्वास आहे, हे युग देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील जनतेचे आभार मानले. आज देशातील सामान्य माणसाच्या मनात जो विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केला, त्याचा हा विजय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. नोटाबंदी जनतेने स्वीकाराली! नोटाबंदीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी नावं ठेवली होती, त्या सगळ्यांना निवडणुकांनी उत्तर दिलं आहे. जे विरोध करत होते, ज्यांनी त्रास सहन केला नाही, त्यांना जागा दाखवण्याचं काम या निकालाने केलं, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचसोबत, देशातील सर्वात मोठ्या राज्यात जो विजय मिळाला, त्यातून देशाचा मूड काय हे अधोरेखित झालं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. नवा इतिहास! उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व यशानंतर भाजपने नवा इतिहास रचला आहे. हा नवा अध्याय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















