एक्स्प्लोर
नो हेल्मेट नो पेट्रोलबाबत चर्चेने तोडगा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई : 'नो हेल्मेट नो पेट्रोल'वरुन राज्यभर गोंधळ सुरु असताना आता विधानसभेतही या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घेतलेल्या निर्णयाला खीळ बसण्याची शक्यता आहे.
रावतेंच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध आहे. त्याचप्रमाणे हेल्मेटचं महत्त्व न पटणाऱ्या वाहनचालकांमध्येही याबाबत मोठा संताप आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. हेल्मेटसक्ती गरजेची असल्याचं सांगतानाच त्यासाठी सरकारला असा नियम करता येणार नसल्याचं अजित पवारांनी विधानसभेत म्हटलं. त्यामुळे तूर्तास तरी रावतेंचा 'नो हेल्मेट नो पेट्रोल' हा निर्णय बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.
काय आहे नो हेल्मेट नो पेट्रोल :
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही, असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' हे फलक तुम्हाला ठिकठिकाणी दिसू शकतील. ज्या मोटारसायकलस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसेल त्याला पेट्रोल मिळणार नाही. शिवाय विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. यापूर्वी केरळमध्येही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची घोषणा करण्यात आली आहे. या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही, अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही ही मोहीम राबविण्यात येत आहे.संबंधित बातम्या
नो हेल्मेट, नो पेट्रोल, रावतेंचा जालीम उपाय !
केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची नवी नियमावली
हेल्मेट सक्तीची पोलखोल, 'माझा'च्या कॅमेऱ्यामुळे पोलिसाकडून दंड वसूल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement