एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग मोकळा, मेट्रो पाचला मंजुरी
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या बैठकीत आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे.
मेट्रो 5 सोबतच मेट्रो 6च्या विस्तारीकरणलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही प्रकल्प DPRच्या मान्यतेसाठी कॅबिनेटकडे पाठविण्यात येणार आहे.
यासोबतच दहिसरपर्यंत असणाऱ्या मेट्रोच्याही विस्तारकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहिसरपर्यंत असणारी मेट्रो मीरा-भाईंदरपर्यंत नेली जाणार आहे.
असा असेल मेट्रो 5चा मार्ग
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5
मेट्रो 5 मध्ये एकूण 17 स्थानकं असणार आहेत.
1. कल्याण APMC
2. कल्याण स्थानक
3. सहजानंद चौक
4. दुर्गाडी किल्ला
5. कोनगाव
6. गोवेगाव
7. MIDC
8. राजनोली गाव
9. टेमघर
10. गोपालनागर
11. धामणकर नाका
12. अंजुर फाटा
13. पूर्णा
14. काल्हेर
15. कशेळी
16. बाळकूम नाका
17. कापूरबावडी
एकूण 24 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 8416 कोटी रुपये आहे.
असा असेल मेट्रो 6चा मार्ग
स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला)-जोगेश्वरी-विक्रोळी- कंजूरमार्ग मेट्रो 6
मेट्रो 6 मध्ये एकूण 13 स्थानकं असणार आहेत.
1. लोखंडवाला संकुल
2. आदर्श नगर
3. मोमीन नगर
4. JVLR
5. शाम नगर
6. महाकाली गुंफा
7. सिप्झ गाव
8. साकी विहार मार्ग
9. रामबाग
10. पवई तलाव
11. IIT Powai
12. कांजूरमार्ग पश्चिम
13. विक्रोळी-पूर्व द्रुतगती मार्ग
एकूण 14.5 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 6672 कोटी रुपये आहे.
दरम्यान, या मेट्रो प्रवासातील किमान तिकीट दर हा 10 रुपये असणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
निवडणूक
भारत
Advertisement