एक्स्प्लोर

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रिया गतीमान; 495 प्रकरणात 35 लाख रुपये वितरीत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाकडून सध्या गतीमान पद्धतीने काम सुरु आहे. आत्तापर्यंत विविध योजनातून 495 प्रकरणांत 35 लाखांहून अधिक मदत करण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गतीमान रितीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणात 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली. त्याच प्रमाणे या योजनेसह रुग्णांना अन्य योजनांद्वारेही एकूण 495 प्रकरणात मदत करण्यात आली आहे. मदत निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीने कार्यवाही करुन निकाली काढण्यात येते, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत काही वृत्तपत्रात नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याअनुषंगाने कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली आहे. वस्तुत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून जलदरित्या रुग्णांपर्यंत मदत पोहोच‍विण्याच्या सूचना दिल्या आहेत. 25 नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यतेसाठी कालपर्यंत 587 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास 495 प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा 192 प्रकरणात रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरुन संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णत: मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी 87 प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कॉकेलर इम्प्लांटची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे 9 प्रकरणे पाठविण्यात आली आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि कॉकेलर इम्प्लांट अशा पद्धतीने 288 रुग्णांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित 207 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे निश्चित करण्यात आले असून 106 प्रकरणात थेट रुग्णालयांकडे मदत वितरीत केली आहे. उर्वरित प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. 50 प्रकरणात अपूर्ण कागदपत्रे असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची स्थिती रुग्णांना समजण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसएमएस सेवा सुरु करण्याबाबतही कार्यवाही सुरु आहे, असेही सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे. हेही वाचा - पंकजा मुंडेंना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेऊ नका : संजय काकडे Cabinate Expansion I ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 23 डिसेंबरला होणार? I एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Mukhyamantri Shaurya Padak : राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Embed widget