एक्स्प्लोर
Advertisement
छगन भुजबळ हे विराट कोहली इतकेच फिट : दमानिया
मुंबई: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र भुजबळांच्या मेडिकल रिपोर्ट पाहता, राजकारणी हे क्रिकेटपटू विराट कोहलीप्रमाणे फिट असतात, असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला.
छगन भुजबळ यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र 22 ते 29 नोव्हेंबर या 8 दिवसात तब्बल 26 जणांशी गाठीभेटी घेतल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईडीनं ही माहिती काल कोर्टासमोर सादर केली.
भुजबळांना भेटणाऱ्यांच्या यादीत आमदार, खासदार आणि बँक अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळेच अंजली दमानिया यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, "भुजबळांचा आरोग्य अहवाल पाहता, राजकारणी हे विराट कोहलीप्रमाणे फिट असतात असं दिसून येतं. भुजबळांची तीन नोव्हेंबरला तपासणी झाली. थेलिअम स्कॅन चाचणीत त्यांचं LVEF हे 74% आढळलं. हे विराट कोहली इतकंच आहे. तरीही ते हॉस्पिटलमध्ये का? डॉक्टरांचं जे पथक भुजबळांवर उपचार करत आहे, ते बदलण्याची गरज आहे"
भुजबळांच्या तपासण्या झाल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयातून जेलमध्ये पाठवायला हवं होतं. मात्र त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केलं. भुजबळ आतापर्यंत 41 दिवस जेलबाहेर आहेत. ते प्रकृतीच्या कारणास्तव तीनवेळा जेलबाहेर आले आहेत, असंही दमानियांनी नमूद केलं.
'तात्याराव लहानेंना हटवा'
भुजबळांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे रुग्णालयात कसं काय हलवलं? भुजबळांना इतके दिवस जेलबाहेर राहण्याची मुभा का? असा प्रश्न विचारत दमानिया यांनी, जे जे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांना छगन भुजबळांच्या तपासणी पथकातून हटवण्याची मागणी केली आहे.
भुजबळांना 26 जण भेटले : ईडी
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 22 ते 29 नोव्हेंबर या 8 दिवसात तब्बल 26 जणांशी गाठीभेटी घेतल्या.
बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याच्या आरोपात भुजबळ सध्या अटकेत असून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र याचा भुजबळ गैरवापर करत असल्याचं दिसून येतंय.
ज्या 26 जणांनी भुजबळांची भेट घेतली, त्यामध्ये शिवसेना आमदार अजय चौधरी, विश्वास को-ऑप बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर, पंकज भुजबळ आणि काही कुटुंबीयांचा समावेश आहे.
अटकेत असताना आरोपीला भेटण्यासाठी परवानगीची गरज असते, मात्र इथे भुजबळांना तब्बल 26 जण भेटून गेले. त्यामुळे याची चौकशी केली जाणार आहे.
भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवलं?
कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, याचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील इडी कोर्टात ‘जेजे’चे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपलं लेखी उत्तर दिलं आहे.
दोन नोव्हेंबर रोजी जे जे हॉस्पिटलने छगन भुजबळांचा ताबा आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं गेलं आणि कोणाच्या सांगण्यावरुन दाखल केलं गेलं याच्याशी जे जे हॉस्पिटलचा काहीही संबंध नसल्याचा दावा तात्याराव लहानेंनी केला आहे.
तसंच आपण कोर्टाचा कुठेही अवमान केला नाही, किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही, असंही तात्याराव लहाने यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ 26 जणांना भेटले : ईडी
भुजबळांची रवानगी कोणाच्या सांगण्याने, डॉ. लहानेंचं उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
नाशिक
Advertisement