एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Rains : कल्याण-कर्जत रेल्वेसेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नल यंत्रणा पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वेसेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वेसेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-कर्जतदरम्यान सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे ट्रॅकमध्ये बिघाड झाला आहे. याची दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे पुढील दोन दिवस कल्याण - कर्जतदरम्यानची रेल्वेसेवा बंद राहण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र येत्या काही तासांत हा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा सकाळपासून ठप्प आहे. तसेच मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस मुंबईबाहेरच्या स्टेशनांवर अडकल्या आहेत. तर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
व्हिडीओ पाहा : रुळाखालची खडी वाहून गेली
कल्याण, अंबरनाथ आणि बदलापुरातल्या रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. कालपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय. अनेक सखल भागात त्यामुळं पाणी साचलं आहे. गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Kalyan | मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर, रहिवासी भागात पाणी साचलं | ABP Majha
इगतपुरीला दुरांतो अडकली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement