एक्स्प्लोर
'ट्रायल'च्या बहाण्याने कारचोरी, एकाच दिवशी एकाच व्यापाऱ्याच्या दोन दुकानांत चोरी
या चोरीप्रकरणी कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या कारचोराचा शोध घेतायत. मात्र या चोरीमुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.

कल्याण : कल्याणमध्ये चोरट्यांनी ट्रायलच्या नावाखाली कार चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांचं धाडस इतकं होतं, की एकाच व्यापाऱ्याच्या दोन दुकानांमध्ये त्यांनी चोरीचा प्रयत्न केला, त्यापैकी एक प्लॅन फसला, तर दुसरा डाव मात्र यशस्वी झाला. उल्हासनगरमध्ये सुधीर जयसिंघानी यांच्या शोरुममध्ये एका चोरट्यानं महागडी फॉर्च्युनर कारची टेस्ट ड्राईव्ह मागितली. मात्र शोरुम कर्मचाऱ्याला चोरावर संशय आल्यानं तो सतर्क झाला आणि त्यानं चोरट्य़ाचा डाव उधळला. VIDEO | 'ट्रायल'च्या बहाण्याने कार लांबवली | कल्याण | ABP Majha त्यानंतर पुन्हा काही तासांनंतर हाच भामटा याच व्यापाऱ्याच्या कल्याणच्या शोरुममध्ये गेला आणि त्याने एक्सयूव्ही 500 ही गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी मागितली आणि गाडी टेस्टींगसाठी मिळताच आठ लाखांची कार घेऊन फरार झाला. या प्रकारानंतर शोरुमचे मालक सुधीर जयसिंघानी यांनी शोरुमचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता उल्हासनगर आणि कल्याणमध्ये गाडी चोरण्यासाठी आलेला भामटा एकच असल्याचं स्पष्ट झालं. प्लॅन करुन आपण गंडवले गेल्याचं लक्षात येताच मालकानं पोलिसात धाव घेतली. या चोरीप्रकरणी कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या कारचोराचा शोध घेतायत. मात्र या चोरीमुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.
आणखी वाचा























