आज अजित पवार यांनी कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला. या अहवालात अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. 50 कोटींपेक्षा जास्त कामाच्या 16 निविदा राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रात जाहिराती न देता काढता देण्यात आल्या असल्याचं यात म्हटलं आहे.
फडणवीस सरकारच्या काळात सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा, कॅगचा ठपका
तसेच 890 कोटींची कामे अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. तर 430 कोटी रुपयांच्या 10 कामात निविदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा ठपका देखील अहवालात ठेवण्यात आला आहे.
यातील 70 कोटींची अतिरिक्त कामे निविदा न मागवता देण्यात आली आहेत. त्यात पारदर्शकता नव्हती. तर 15 कोटींपेक्षा जास्त किमतींची सात कामे देताना तांत्रिक मूल्यांकन करताना गोंधळ दिसून आला आहे, असं अहवालात म्हटलं आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील कामात टेकडी कापण्यासाठी 2033 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच टेकडीपासून निघालेल्या दगडांनी भरणा केला आहे. तरी देखील भरणा करण्याच्या कामासाठी 22.08 कोटी खर्च झाल्याचे दाखवले आहे. कामाच्या विलंबसाठी कंत्राटदाराकडून 186 कोटी रुपये वसूल करायला हवे होते मात्र सिडकोने ते वसूल केलेले नाहीत, असं देखील या अहवालात म्हटलं आहे.
रिपोर्ट येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज आक्षेपार्ह : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात कॅगच्या अहवालात अनियमितता असल्याचे म्हटल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कॅगच्या अहवालात 2013 एप्रिलपासून 2018 पर्यंतच्या सिडकोच्या विविध कामांचे अवलोकन केलेलं आहे. हा अहवाल येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज झालं तेसुद्धा आक्षेपार्ह आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, तीन इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या कामांचा यात उल्लेख आहे. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरुळ-उरण रेल्वे आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या टेंडर संदर्भात बाबींवर आक्षेप घेतले आहेत. यातले नवी मुंबई मेट्रो रेल आणि नेरुळ-उरण रेल्वे या दोन्ही प्रकल्पाच्या सर्व निविदा आणि निर्णय 2014 पूर्वीचे आहेत. त्या काळात टेंडर ऑगस्ट 2014 ते अॅडव्हान्स पेमेंट सप्टेंबर 2014 च्या आहेत.
राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, कॅगचा संशय
फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई एअरपोर्टचे टेंडर 2015 नंतरचे आहेत. ज्यात खडक भरणीचे 20 कोटींच्या देयकाबाबत आक्षेप नोंदवले आहेत. यात प्रोसेजरीयल लॅप्सेस आहेत, ते नक्कीच सुधारायला हवेत. मात्र सिडकोच्या बोर्डात मंत्री किंवा मुख्यमंत्री नसतात. सिडको पूर्णतः स्वायत्त संस्था आहे. टेंडर प्रक्रिया बोर्डाच्या पातळीवर होते. कॅगने नोंदवलेल्या आक्षेपांवर पब्लिक अकाउंट्स कमिटी (PAC) संबंधित अधिकाऱ्यांची सुनावणी घेऊन कारवाई करतील, असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं.