Mumbai Building Slab Collapsed : मुंबईतील (Mumbai) मुलुंड (Mulund) इथल्या नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. 'ग्राउंड प्लस टू' असं या इमारतीचं स्ट्रक्चर होतं. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्याला होतं. या दुर्घटनेनंतर या इमारतीमधून सर्व कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं आहे. 


मुंबईच्या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन वरिष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे, ही इमारत धोकादायक घोषित करुनही या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या देवशंकर शुक्ला (93) आणि आरखी शुक्ला (87) या दाम्पत्याचा या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली. त्यानंतर इमारतीतील सर्व नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. 




काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई महापालिकेचं (Bruhan Mumbai Mahanagar Palika) पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. यामध्ये वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झालं होतं. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीसुद्धा अनेक कुटुंब इमारतीमध्ये वास्तव्यास गेले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :