एक्स्प्लोर
भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा आठवर

LIVE UPDATE : अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल भिवंडी (मुंबई) : भिवंडीत पुन्हा एकदा इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. हनुमान टेकडी भागातील महादेव नावाची ही इमारत असून ती दोन माळ्यांची होती. या इमारतीखाली 6 ते 7 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या इमारतीत घरमालकासह तीन कुटुंबं राहात होती. त्यातील ठाकूर कुंटुंबातील सहा जण आणि घरमालकाचा मुलगा इमारतीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही इमारत धोकायदायक असल्याची नोटीस महापालिकेने यापूर्वीच दिली होती, अशीही माहिती मिळते आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















