एक्स्प्लोर
शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्सची 36 हजारांवर विक्रमी उसळी
सेन्सेक्स काल 35,798 अंकांवर बंद झाला होता. बाजार उघडताच त्यामध्ये 200 अंकांनी वाढ होऊन तो 36 हजाराच्या वर गेला.
![शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्सची 36 हजारांवर विक्रमी उसळी BSE Sensex reaches 36,004, up by 206; Nifty at 11,025 शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्सची 36 हजारांवर विक्रमी उसळी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12112923/Sensex-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराची घौडदौड सुरुच आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने ऐतिहासिक भरारी घेत, 36 हजाराचा टप्पा गाठला. दुसरीकडे निफ्टीनेही 11 हजाराचा पल्ला गाठला.
सेन्सेक्स काल 35,798 अंकांवर बंद झाला होता. बाजार उघडताच त्यामध्ये 200 अंकांनी वाढ होऊन तो 36 हजाराच्या वर गेला.
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत असल्याचं जाणकारांचं मत आहे.
सोमवारीसुद्धा शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं नवा रेकॉर्ड केला होता. बाजार खुलताच क्षणी सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला होता, तर निफ्टीनंही 10910 या नव्या आकड्याला गवसणी घातली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)