एक्स्प्लोर
मुंबई हायकोर्टाच्या कोर्टरुममध्ये मोबाईल नेण्यास बंदी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आलीय. फक्त मोबाईल फोनच नाही तर कॅमेरा किंना अन्य कोणतंही रेकॉर्डिंग करता येणारं गॅजेट कोर्टरूममध्ये घेऊन जाता येणार नाही. उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना मात्र या नियमातून सूट देण्यात आलीय.
कोर्टरूममध्ये जे कुणी मोबाईल हँडसेट किंवा अन्य कोणतंही रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट घेऊन जातील त्यांच्यावर न्यायालय अवमानना कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार दंड आणि कारावास अशी तरतूद आहे.
कोर्ट हॉलमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर अगोदरपासूनच बंदी आहे, मात्र काही जण आपला फोन सायलेन्स मोडवर ठेऊन कोर्टरूममध्ये जाऊ शकत होते, आता सायलेन्स मोडवर असलेला मोबाईलही तुम्हाला कोर्टरूममध्ये घेऊन जाता येणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या कोर्टात एका व्यक्तीला कोर्टाच्या कारवाईचं मोबाईल फोनच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करताना एका वकिलांनी हटकलं. त्यानंतर कोर्टाच्या सूचनेनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल मंगेश पाटील यांनी कोर्ट रूममध्ये मोबाईल फोन नेण्यात बंदी असल्याचे आदेश जारी केले.
मुंबई उच्च न्यायालयात वकिलांसाठी त्यांच्याकडे असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीच्या माहितीसाठी एसएमएस सेवा चालवली जाते. त्यासाठी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement