एक्स्प्लोर

रिक्षा परमिट, बॅचसाठी बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी अटकेत

पोलिस पथकाने चौकशी करुन आरोपींच्या घराची आणि दुकानाची तपासणी केली असता, 284 फाईल, 211 ऑटो रिक्षाचे पासिंग फाईल, 39 इन्शुरन्स फाईल, 34 लर्निंग लायसन्स जप्त करण्यात आले आहेत.

ठाणे : रिक्षा परमिट, वाहन चालवण्याचा परवाना आणि रिक्षा बॅच बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून, त्याचा वापर आरटीओ कार्यालयात करणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखा भिवंडी युनिट-2 च्या पथकाने धामणकर नाका इथे छापा मारुन ही कारवाई केली. यापैकी दोघांना 18 जानेवारीला अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी दोघांना अटक करुन, अनेक बनावट दस्तऐवज आणि शिक्के हस्तगत केले. पोलिसांनी 18 जानेवारी रोजी संजरी ऑटो कन्सल्टंट, धामणकर नाका इथून आरोपी नफीज सगीर अहमद फारुकी आणि आरोपी नाजील नवाज अहमद मोमीन यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट चारित्र्य प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा नागरिक असल्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट, रिक्षा परमिटचे दस्तावेज, मोटार विम्याचे कागदपत्र, लॅपटॉप, हस्तगत केले होते. या दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी मोहम्मद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी उर्फ पप्पू आणि आरोपी संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी यांना अटक करुन त्यांची चौकशी केली. त्यानंतर आरोपी अन्सारी उर्फ पप्पू आणि स्वामी याच्या घराची झडती घेतल्यानंतर बनावट शाळा सोडल्याचे दाखले, डॉक्टरांचा बोगस शिक्का, आरटीओ अधिकाऱ्याचा शिक्का, बजाज इन्शुरन्स कंपनीचा शिक्का, तसंच या शिक्क्यांचा वापर करुन तयार केलेली कागदपत्र पोलिसांना सापडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चारही आरोपींकडून 45 बोगस चारित्र्य पडताळणी दाखले, 20 शाळा सोडल्याचे दाखले, 34 बनावट डोमिसाईल  प्रमाणपत्र, 44 विमा कंपनीचे बनावट दाखले, डॉक्टरांचा बोगस शिक्का,आरटीओ अधिकाऱ्यांचा शिक्का, बजाज इन्शुरन्स कंपनीचा शिक्का, 5 मोबाईल, 3 संगणक आणि 3 लॅपटॉप, असा 1 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस पथकाने चौकशी करुन आरोपींच्या घराची आणि दुकानाची तपासणी केली असता, 284 फाईल, 211 ऑटो रिक्षाचे पासिंग फाईल, 39 इन्शुरन्स फाईल, 34 लर्निंग लायसन्स जप्त करण्यात आले आहेत. या चारही आरोपींना न्यायालयात नेलं असता न्यायालयाने त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget