एक्स्प्लोर

BMC: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक; 160 प्रस्तावांना मिळणार मंजुरी?

BMC Standing Committee Meeting : मुंंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक सोमवारी पार पडणार आहे.

BMC Standing Committee Meeting : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची मुदत आज 7 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक आज पार पडणार असून 160 अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची दाट शक्यता आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे हे प्रस्ताव असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार 8 मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून सुरू राहणार आहे.  मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यानंतर काही दशकांनतर पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

शेवटची स्थायी समिती बैठक वादळी ठरणार?

मुंबई महापालिका निवडणुकीआधीची ही शेवटची स्थायी समितीची बैठक आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत जवळपास 180 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील काही प्रस्तावांना भाजपने विरोध केला होता. त्यामुळे काही प्रस्ताव राखून ठेवण्यात आले. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून स्थायी समितीमधील प्रस्ताव मंजूर करण्याचे प्रयत्न असतील. तर, भाजपकडून याला विरोध होण्याची दाट शक्यता आहे. भाजपने याआधीच स्थायी समितीमधील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. 

यशवंत जाधव यांच्याविरोधात भाजप आक्रमक?

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर खात्याने धाड टाकली होती. जवळपास चार दिवस आयकर विभागाने त्यांच्या घरी ठाण मांडले होते. जाधव यांच्याविरोधात असणाऱ्या कारवाईच्या मुद्यावरदेखील भाजपकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. 

काय असतील प्रस्ताव?

स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण, मलनि:सारण वाहिन्या,  जलाशय बोगदा. महापालिका रुग्णालयांसाठीचे विविध प्रस्ताव, अग्निशमन दलासाठीचा प्रस्ताव आदींचा समावेश आहे. 

इतर महत्त्वाची बातमी:

BMC Election : मुंबईत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची शिवसेनेत लॉबिंग सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wife Forces Husband To Sell Kidney : फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
Maharashtra Kesari 2025 : 16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
Share Market : बजेट दिवशी अपेक्षाभंग,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? हे 'तीन' घटक प्रभावी ठरणार
बजेट दिवशी थंड प्रतिसाद ,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? कोणते घटक प्रभावी ठरणार?
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवरABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सPruthviraj Mohol Maharashtra Kesari| वडिलांचे स्वप्न साकार,महाराष्ट्र केसरी मोहोळची प्रतिक्रियाMaha Kumbh 2025 | प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात विदेशी भाविक दाखल, म्हणाले... ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wife Forces Husband To Sell Kidney : फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
Maharashtra Kesari 2025 : 16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
Share Market : बजेट दिवशी अपेक्षाभंग,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? हे 'तीन' घटक प्रभावी ठरणार
बजेट दिवशी थंड प्रतिसाद ,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? कोणते घटक प्रभावी ठरणार?
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, युवराज सिंग म्हणाला तुझा अभिमान वाटतो, युवा खेळाडू म्हणतो, ते आनंदी....
मला तुझा अभिमान वाटतो, युवराज सिंगचं शिष्याच्या फटकेबाजीवर ट्विट, अभिषेक शर्मा म्हणाला युवी पाजी आनंदी असतील...
RBI : अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला दिलासा, आता आरबीआय कर्जदारांसाठी मोठा निर्णय घेणार? लवकरच बैठक
केंद्रानं 12 लाखांपर्यंत कर सवलत दिली, आता आरबीआयकडे मध्यमवर्गाचं लक्ष, रेपो रेट बदलणार?
Abhishek Sharma : 13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
Embed widget