एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे
मुंबई : "मुख्यमंत्र्यांनी त्यांचे दूत पाठवले. अनेक आमिषं दाखवली. मात्र मी नम्रपणे नकार दिला. कारण मी शिवसैनिक आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरे यांनी दिली आहे. सुधीर मोरे हे बंडखोर विजयी अपक्ष उमेदवार स्नेहल मोरे यांचे दीर आहेत.
घाटकोपरमध्ये शिवसेना उमेदवारांच्या विरोधात माजी शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या वहिनी अपक्ष स्नेहल मोरे या एक हजार मतांनी निवडून आल्या. शिवसेनेत आज सुधीर मोरेंसह स्नेहल मोरेही प्रवेश करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता त्यांचा पक्षप्रेवश होईल. विशेष म्हणजे सुधीर मोरेंची बंडखोरी केल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मात्र सुधीर मोरे यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. याविषयी बोलताना सुधीर मोरे म्हणाले की, "मी हाडामासाचा शिवसैनिक म्हणून स्वगृही परतत आहे. अन्याय झाला की बंड करा, ही बाळासाहेबांची शिकवण होती, म्हणून बंड केलं. पण निवडणूक झाली, आता विषय संपला."
मी हाडामासाचा शिवसैनिक म्हणून स्वगृही परतत आहे. अन्याय झाला की बंड करा, ही बाळासाहेबांची शिकवण होती, म्हणून बंड केलं. पण निवडणूक झाली, आता विषय संपला : सुधीर मोरे
"भाजपच्या अनेकांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे दूत पाठवले होते. अनेक आमिष दाखवली, मात्र नम्रपणे नकार दिला. शिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी झाला आहे," असा दावा सुधीर मोरे यांनी केला आहे. मुंबईच्या वांद्र्यातील मुस्लीमबहुल बेहरामपाड्यात शिवसेनेचा भगवा!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement