एक्स्प्लोर
मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी?
मुंबई : मुंबई महापालिकेच्या 17 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांची आज निवडणूक पार पडली. ए, बी आणि ई, सी आणि डी, एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर, जी-दक्षिण, पी दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर आणि आर-मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली.
यात ए, बी आणि ई प्रभागात आज निवडणूक झाली. इतर प्रभाग समित्यांच्या निवडणुका या बिनवरोध पार पडल्या.
भाजप पुरस्कृत आभासेच्या गीता गवळी ए,बी, ई प्रभागात सेनेच्या पाठिंबाने विजयी झाल्या. तर बाकी प्रभाग समितीवर सेना-भाजपच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे.
कुठल्या प्रभाग समितीत कोण विजयी?
- ए , बी आणि इ - गीता गवळी ( अभासे )
- सी आणि डी - ज्योत्स्ना मेहता ( भाजप )
- एफ दक्षिण आणि एफ उत्तर - प्रल्हाद ठोंबरे ( शिवसेना )
- जी दक्षिण - आशिष चेंबुरकर ( शिवसेना )
- पी दक्षिण - राजुल देसाई ( भाजप )
- पी उत्तर - दक्षा पटेल ( भाजप )
- आर दक्षिण - कमलेश यादव ( भाजप )
- आर उत्तर आणि आर मध्य - शीतल म्हात्रे ( शिवसेना )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement