एक्स्प्लोर

LIVE: उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी

मुंबई: अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी या अखेर भाजपच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. भाजपने गीता गवळी यांना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. गीता गवळी या थोड्या वेळापूर्वी भाजप कार्यालयात दाखल झाल्या. याशिवाय वॉर्ड 102 मधील अपक्ष नगरसेविका मुमताज रहेबर राजा खान यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 झालं आहे. भाजप आज या 84 जणांच्या गटाची नोंदणी विभागीय कोकण आयुक्तांकडे करणार आहे. भाजप पारदर्शक काम करते, विकास करते म्हणून भाजपसोबत येत असल्याचं गीता गवळी यांनी सांगितलं.  उद्धव ठाकरेंबद्दल काही बोलायचं नाही, मात्र खालच्या लोकांवर नाराजी आहे. मी आरोग्य समिती आणि स्थायी समितीमध्ये पद मागितलं होतं, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत शब्द दिला. शिवसेनेनं साथ दिली असती, तर अजून एक आमचा नगरसेवक इथे असता, असंही गीता गवळी यांनी सांगितलं. मनोज कोटक गटनेतेपदी दरम्यान भाजपने पुन्हा एकदा मनोज कोटक यांची गटनेतेपदी निवड केली आहे. कोटक हे यंदा तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मनोज कोटक हे गुजराती असले तरी मराठीवर त्यांचं प्रभुत्व आहे. याशिवाय ते स्थायी समिती सदस्य आहेत. यापूर्वी कोटक यांनी सुधार समितीचं सदस्यपद सांभाळलं होतं. महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. कोटक यांचा पालिकेतील कामकाजाच्या तांत्रिक बाजूंचा चांगला अभ्यास आहे. ते मुलुंडमधून निवडून आले आहेत.  गीता गवळी 'वर्षा'वर अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. गीता गवळी आज कोकण भवनात जाऊन गटनोंदणी करणार आहेत. त्यामुळे गीता गवळी यांना आपल्या बाजूने वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे. महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित याआधी गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यांनी गुरुवारी शिवसेना भवनातही हजेरी लावली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसेना भवनात गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिसकटली. त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गीता गवळी यांना चर्चेसाठी काल ‘वर्षा’ बंगल्यावर बोलवलं होतं. गीता गवळींना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपद देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या मागण्या मान्य केल्याने गीता गवळी आता महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी थेट अरुण गवळी यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात होतं. संबंधित बातम्या गीता गवळींना वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अरुण गवळींकडे सेटिंग? ...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत! BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा? शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget