Maharashtra Mumbai Crime News: ठाकरे गटाच्या (Shivsena : Uddhav Balasaheb Thackeray) माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरात घुसून त्यांच्या पुतणीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात माजी नगरसेविकेची पुतणी गंभीर जखमी झाली असून उचपारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांच्या मदतीला शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) धावून आले आहेत. 


मुंबईच्या (Mumbai Crime News) बोरिवली (Borivali News) पूर्वेतील अभिनव नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरात घुसून अज्ञातांना त्यांच्या पुतणीवर हल्ला केला केला. या हल्ल्यात रिद्धी खुरसंगे यांची पुतणी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांच्या मदतीला शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) धावून आले आहेत. 


शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं आणि राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. तेव्हापासून शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट. संपूर्ण राज्यभरात ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये वाद सुरू आहेत. मात्र मुंबईतील (Mumbai News) एका धक्कादायक घटनेनं ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील दुरावा काही काळासाठी का होईना, कमी झाल्याचं पाहायला मिळालं. 


माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरात अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांना माहिती मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे तात्काळ ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या मदतीला धावून आले. आमदार सुर्वे यांनी रुग्णालयात जाऊन रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, घडलेल्या धक्कादायक घटनेचा तपास करुन आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pune Crime news : भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत? पुण्यात दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; MPSC करणाऱ्या तरुणीवर मित्राचा कोयत्यानं हल्ला