एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Budget : शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर
मुंबई: मुंबई महापालिकेचा 2017-18 चा शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना अतिरीक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर केला.
शिक्षण समितीसाठी यंदा 2311.66 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या शिक्षण समिती अर्थसंकल्पात 83 कोटींची घट झाली आहे.
बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे
- डिजीटल स्कूल अंतर्गत 1200 महापालिकेच्या शाळा डिजीटल होणार आहेत. यासाठी बजेट मध्ये दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- बंद झालेल्या शाळांचं एकत्रीकरण करुन बंद झालेल्या शाळा आदर्श शाळांच्या धर्तीवर उभारणी करणार.
- शिक्षण विभागाकडून मुंबई विभागात अद्ययावत सभागृह निर्माण करणार
- ९ वी -१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कार्यक्रम.
- शालेय विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी- नॅपकीन वेंडिंग/ बर्निंग मशिनची उभारणी
- बीएमसीच्या १२० प्राथमिक , ५५ माध्यमिक शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर
- टॅब योजना गेल्या वर्षीप्रमाणेच चालू
- खाजगी शाळातील "सिस्टर स्कूल"-- पूर्व उपनगरांतील ३२ महापालिका शाळांमध्ये खाजगी शाळेतील शिक्षकांना घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार
- टॅबसाठी तरतूद-- 2017-18 साठी 7.83 कोटींची तरतूद
- व्हर्च्युअल क्लासरुमसाठी 19 कोटींची तरतूद
- टॅबसाठी 7.83 कोटींची तरतूद
- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश- 31 कोटी
- 27 शालेय शिक्षण वस्तुंसाठी 98 कोटी
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास योजना
- विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी खास उपस्थिती भत्ता
- दिव्यांग विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता-; 1.16 कोटी
- दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 10 तसंच प्रतिपालक 10 असा एकूण 20 रुपये प्रतिदीन उपस्थिती भत्ता मिळणार.
- एकूण 4094 दिव्यांग विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार.
- तसंच, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी- 40.94 लाख
- बालवाडी वर्गातील मुलांसाठी खास टॉय लायब्ररी-- 1.76 कोटी
- मोफत क्रीडा गणवेश -- ३१ कोटी
- क्रीडा प्रशिक्षक-- २१ कोच, ७ प्रशिक्षीत क्रीडा प्रशिक्षक--३८.६२ लाख
- महापालिका शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा मिळवून देण्यासाठी खास प्रयत्न/योजना--
- विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षांचे आयोजन
- महापालिकेच्या २६ शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवणार. त्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक बाबी उपलब्ध करुन देणार- १ कोटीची तरतूद
- शिक्षण विभागाच्या कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या मालकीचे अद्ययावत सभागृह-- ५० लाख तरतुद
- ई वाचनालये
- कौशल्य विकास, व्यवसायभिमुख शिक्षणाला चालना देणारी विकासकेंद्रे
- विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर्स
- संगीत अकादमी सुरु करण्याची भरीव तरतूद
- दर्जेदार माध्यान्ह भोजनासाठी भरीव तरतूद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
करमणूक
करमणूक
Advertisement