एक्स्प्लोर
मुंबईत लेप्टो, कावीळ आणि टायफॉईडचे रुग्ण वाढले
मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने नुकताच संसर्गजन्य रोगाच्या प्रसारासंबंधिची आकडेवीरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केली. यात लेप्टो, कावीळ आणि टायफाईडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर मलेरीया आणि डेंग्यूची भीती कमी झाल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
गेल्या वर्षी जानेवारी ते जून – २०१५ या दरम्यान महापालिका क्षेत्रातील लेप्टो रुग्णांची संख्या ५ इतकी होती. तर जानेवारी ते जून – २०१६ या कालावधीत ही संख्या ३० इतकी झाली आहे.
तर कवीळीच्या रुग्णांच्या संख्येतही यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कावीळच्या रुग्णांच्या संख्येत २१५ ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान ५८२ रुग्णांची होती. या वर्षी ती संख्या वाढून ७९७ झाली आहे. यापैकी एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
टायफाईडच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या कालावधी दरम्यान ५३१ रुग्णांची होती. तर या वर्षी ही संख्या ७१२ नोंद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या जानेवारी ते जून – २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधी दरम्यान महापालिका क्षेत्रातील डेंग्यू रुग्णांची संख्या १७१ इतकी होती. तर जानेवारी ते जून – २०१६ या कालावधीत ही संख्या १५४ इतकी आहे. तसेच संख्या जानेवारी ते जून – २०१५ या कालावधीत संशयीत डेंग्यू रुग्णांची ही ६७८ इतकी होती. हीच संख्या या वर्षी ५९० इतकी आहे.
तर जानेवारी ते जून – २०१५ या दरम्यान महापालिका क्षेत्रातील हिवतापाच्या (मलेरिया)बाबत २७९५ रुग्णांची नोंद झाली होती, तर याच कालावधी दरम्यान २ दुर्दैवी मृत्यूंची नोंद झाली. जानेवारी ते जून – २०१६ या कालावधीत ही संख्या २१०२ इतकी आहे.
स्वाईन फ्लू (एच१एन१) च्या बाबतीत गेल्या वर्षी जानेवारी ते जून – २०१५ पर्यंत १८३४ रुग्णांच्या नोंदीसह २ मृत्यूंची नोंद झाली. या वर्षी जानेवारी ते जून – २०१६ या कालावधी दरम्यान २ एच१एन१ रुग्णांची नोंद झाली आहे.
गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या या वर्षीच्या संख्येत घट झाली असूनृ गेल्या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ५४०३ रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी याच कालावधीतील रुग्णांची संख्या ५०९४ झाली आहे.
लेप्टोबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेद्वारे उंदीर मारण्याची कार्यवाही अधिक तीव्र करण्यात आली आहे. जानेवारी ते जून – २०१६ या कालावधीत महापालिकेच्या पथकांद्वारे १ लाख ९ हजार १८७ उंदीर मारण्यात आले आहेत. तसेच तबेल्यांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement