एक्स्प्लोर

होय तो पूल आमचाच आहे, टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली

मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी दोन्ही प्रशासनांनी हात वर केले होते.

मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी दोन्ही प्रशासनांनी हात वर केले होते. पालिकेने म्हटले होते की, पूल रेल्वेचा आहे, तर रेल्वेने सांगितले होते की, पुलाची जबाबदारी पालिकेची आहे. या प्रकारामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु अखेरीस हा प्रश्न सुटला आहे. हा पूल पालिकेचाच असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे. सुरुवातीला पालिकेच्या स्थानिक नगरेसेविका सुजाता सानप म्हणाल्या होत्या की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती". त्यावर रेल्वेने उत्तर दिले की, "हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे". मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन या घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. तसेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर याबाबत म्हणाले की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती." परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वीच स्थानिक नगरसेवकांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे. यावर उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, हा पूल बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तरिदेखील आमचे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत आहे. रेल्वेचे डॉक्टर आणि अधिकारी घटनास्थळी असून जखमींची मदत करत आहेत. तसेच एक वर्षापूर्वी या पुलाचे ऑडीट करुन आम्ही या पुलाची डागडुजी केली होती. पुलाबाबतची माहिती हा पूल 1988 साली बांधण्यात आला. 2016 साली पुलाची किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली. 2017 मध्ये पुलाची पहाणी करण्यात आली. जे. डी. देसाई कन्सल्टंटने हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला डिसेंबर 2018 मध्ये पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची निविदा काढण्यात आली, परंतु ही निविदा अद्याप स्थायी समितीमध्ये प्रलंबित आहे. अखेर हा पूल पालिकेचा असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना मान्य केले आहे. VIDEO 

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Embed widget