एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रस्ते घोटाळ्यात काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा काम
मुंबई : रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने पुन्हा काम दिल्याचं समोर आलं आहे. त्याबाबतचा प्रस्तावच स्थायी समितीने सादर केला असून त्याला शिवसेना-भाजपने मंजुरी दिली आहे.
चौकशी समितीने कारवाईची शिफारस केली असताना हँकॉक पुलासह चार पूल बनवण्याचे कंत्राटच या काळ्या यादीतील कंत्राटदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन याची पूर्ण जबाबदारी घेणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
दुसरीकडे, याबाबतची जबाबदारी स्थायी समितीवर आली तर आम्ही मुंबईकरांना काय उत्तर देणार असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने केला. मात्र प्रस्ताव मंजूर करण्यास भाजपने मदत केली, तर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement