एक्स्प्लोर

मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते कर नाही : भाजप

मुंबई : मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते कर घेणार नाही, अशी अनेक आश्वासनं भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून दिली आहे. टॅक्स टेररिझमविरोधात भाजप मुंबईकरांसाठी करात भरघोस सूट देण्याच्या तयारीत असल्याचं भाजपने जाहीरनाम्यात सांगितलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेने आश्वासनांची खैरात करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने वचननाम्याची रुपरेषा जाहीर करताच, भाजपनेही जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मुंबई महापालिका सध्या रस्ते कर आकारते. एकूण करापैरी साधारण 13 टक्के कर रोड टॅक्समधून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत रोड टॅक्स आकारणार नाही, असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं आहे. मुंबईकरांना 24 तास पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाणी पट्टी आकाराली जाणार नाही, अशी भूमिका भाजपने जाहीरनाम्यात घेतली आहे.

500 चौ.फुटांच्या घरांना मालमत्ता कर नाही : उद्धव ठाकरे

मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची मागणी आपली असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मी आमदार म्हणून राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. तसेच तिला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आता भाजपच्या जाहीरनाम्यात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते टॅक्स घ्यायचा नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असं शेलार यांनी सांगितलं. रस्ते टॅक्समधून महापालिकेला 500 ते 600 कोटी मिळतात, पण रस्त्यांची अवस्था तशीच असते. त्यामुळे महापालिकेच्या ‘टॅक्स टेररिझम’मधून मुंबईकरांना सुटका मिळावी,ही आमची भूमिका आहे. यानंतर आता काही जणांना उपरती होत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही  : सोमय्या ‘माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे. राहता राहिला प्रश्न जाहीरनाम्याचा, तर शिवसेनेने आतापर्यंत काय केलं? महापालिकेतील गेल्या 22 वर्षांचा हिशोब द्यावा’, अशी मागणी सोमय्यांनी केली. शिवसेना आणि सेना नेत्यांची नोटाबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे, त्यामुळे त्यांची अडचण समजू शकतो, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली. भाजप हा मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र, देशात एक नंबरचा पक्ष आहे. कोणी मित्रपक्ष आमच्याबरोबर येत असेल तर त्यांना किती जागा द्यायच्या हा एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुणाकडे भीक मागत नाही तो काळ आता गेला, असा टोलाही किरीट सोमय्यांनी लगावली. संबंधित बातम्या

मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार

माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही, सोमय्यांचा घणाघात

महत्त्वाच्या बातम्या

आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Embed widget