नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका हळूहळू जवळ येत आहेत. विविध महापालिकांसाठी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात येत आहे. आज (मंगळवार) देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपूर्वी 41 पॅनेलमध्ये एकूण 122 प्रभाग बनविण्यात आले आहेत. पण या प्रभाग रचनेवर भाजपा पक्षाने आक्षेप घेतला असून न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.


ऐरोली विधानसभा क्षेत्रात 23 ते 25 हजार मतदार संख्या असलेले प्रभाग करण्यात आले आहेत. तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात 30 ते 31 हजार मतदार संख्या असलेले प्रभाग बनविण्यात आले आहेत. या ठिकाणी शिवसेनेची ताकद अधिक तेथे अधिक प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे, असा आरोप भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. या प्रभाग रचनेच्या विषयी बैठक घेऊन सर्व विभागातील हरकती आणि सूचना ऐकून घेत निवडणूक आयोगाला यासंबंधीची माहिती देणार आहोत. मात्र निवडणूक आयोगाकडून आम्हाला अधिक अपेक्षा नसल्याने आम्ही याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही भाजपा आमदार गणेश नाईक यांनी सांगितले आहे. तसंच ज्या अधिकाऱ्यांनी ही प्रभागरचना करताना नियमबाह्य काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील भाजपा न्यायालयात करणार  असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.


हे ही वाचा - 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live