BMC Mumbai Mahapalika New Ward :  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 साठी बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर आता नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असणार आहेत. या संदर्भातील प्रारुप आराखडा बीएमसीकडून जारी करण्यात आला आहे. आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे.
 
वॉर्डच्या नवीन सीमा केल्या जाहीर 
मुंबई महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर केली आहे. आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. वॉर्डच्या नवीन सीमा केल्या जाहीर केल्या आहेत.  नवीन सीमांचा मॅप  जाहीर केला आहे. आता यावर हरकती सूचना नोंदविल्या जाणार आहे.


नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत.  शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये,  पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. वाढीव 9 वॉर्ड पैकी 6 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात, त्यामुळे वॉर्ड पुर्नरचनेवर भाजपकडून आक्षेप नोंदवला जाण्याची शक्यता आहे. 


मुंबईतील 9 नव्या वॉर्डची यादी


वाढीव 9 वॉर्ड पैकी 6 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले


तर इतर 3 वॉर्डमध्ये भाजप आमदारांचं प्राबल्य


कॉग्रेस, राष्ट्रवादी आमदारांच्या विभागात मात्र नवीन वॉर्ड नाहीत


मुंबई शहर


F south - परळमध्ये - 1 वॉर्ड वाढला - येथे आमदार शिवसेनेचे अजय चौधरी


g south - वरळीत 1 वॉर्ड वाढला - येथे आमदार शिवसेनेचे आदित्य ठाकरे


E Word - भायखळा- 1 वॉर्ड- येथे आमदार शिवसेनेच्या यामिनी जाधव 


पश्चिम उपनगर- 


R north- दहिसर - 1 वॉर्ड वाढला- भाजपच्या आमदार मनिषा चौधरी


K east आणि H east  मिळून - अंधेरी पूर्व 1 येथे वॉर्ड - येथे आमदार शिवसेनेचे रमेश लटके 


R south- कांदिवलीत 1 वॉर्ड-  आमदार भाजपचे अतुल भातखळकर 
  
पूर्व उपनगरे
L word- कुर्ला- 1 वॉर्ड - येथे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर 


N word - घाटकोपर मध्ये- 1 वॉर्ड वाढला- आमदार भाजपचे पराग शहा


M east- चेंबुर- 1 वॉर्ड- -येथे आमदार शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर