एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चर्चेसाठी भाजपचे दोन मंत्री 29 मार्चला 'मातोश्री'वर जाणार: सूत्र
मुंबई: शिवसेना आणि भाजपमधील संबंधांमध्ये दिवसेंदिवस दुरावा वाढत चालला आहे. भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. युतीतील तणावाचं वातावरण निवळावं यासाठी आता भाजप पुढाकार घेणार आहे. 29 मार्चला भाजपचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
भाजप आणि शिवसेनेमधील तणाव वाढत चालला आहे. त्याचीच परिणिती म्हणून भाजपच्या नेत्यांकडून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्या अशी मागणी होत आहे. काल (गुरुवार) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यावेळी देखील हाच मुद्दा मांडण्यात आला. किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फोडून त्यांना भाजपच्या चिन्हावर पुन्हा निवडून आणावं असाही पर्याय समोर ठेवण्यात आला. पण या दोन्ही पर्यायांवर बैठकीत 50-50% मतं पडली त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.
राजकीय समीकरणं पाहता भाजपनं शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 29 मार्चला भाजपकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. युतीतील ताणलेले संबंध निवळावे यावर चर्चा करण्यासाठी हो दोन्ही नेते मातोश्रीवर जाणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement