Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसच्या (Congress) नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे. शुक्रवारी रणदीप हुड्डाची (randeep hooda) मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट (Swatantra Veer Savarkar Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राहूल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकीट पाठवून डिवचण्यात आले आहे.

    


भाजप (BJP) युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना (Tajinder Singh Tiwana) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची तीन तिकीट काढत राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना पाठवली आहेत. तसेच सोबत पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक्सचे कुपन देखील पाठवण्यात आले आहेत. तुमच्या पक्षाची सर्व खाती गोठवल्याने तुमच्याकडे पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंक्सचेही पैसे नसतील, त्यामुळे कुपन पाठवल्याचे तिवाना यांनी म्हटले आहे. 


नेमकं काय म्हणाले तेजंदर सिंग तिवाना? 


तेजंदर सिंग तिवाना म्हणाले की, राहुल गांधीजी जय श्रीराम! मी तुम्हाला, सोनिया जी आणि प्रियंका जी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर ( चित्रपटाचे तीन तिकीट पाठवत आहे. तुम्ही देशाच्या कायमस्वरूपी विरोधी पक्षाचे नेते आहात. त्यामुळे तुम्हाला आपल्या देशाच्या इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे.  माझा दावा आहे की हा चित्रपट बघून आपला आणि आपल्या परिवाराचे डोळे उघडतील. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहून या, असे त्यांनी म्हटले आहे. 


चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने झालं होतं स्वागत


दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra News) आले होते. मुंबईत शिवसेना भवनासमोर त्यांचे स्वागत करण्यात आले. अनिल देसाई यांनी स्वागत केल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनाच्या परिसरातून थोडासा पुढे गेला. त्यानंतर राहुल गांधी  शिवाजी पार्कपासून चैत्यभूमीकडे जात असताना बँड पथकाने अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  जयोस्तुते जयोस्तुते या गाण्याची सुरावट वाजवली होती. राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar on Shahu Maharaj : 'वंचित'कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना आमचा पूर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा


Kedar Dighe : कल्याणमधून केदार दिघे दंड थोपटणार, उद्धव ठाकरेंच्या डावावर श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर; कोण बाजी मारणार?