एक्स्प्लोर
मुलुंडमध्ये रावणदहनानंतर 'रामायण' सुरु, भाजप नेत्यांचा कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या

मुंबई : मुलुंडमध्ये भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमात शिवसेनेने धुडगूस घातल्यानंतर आता भाजपनेही जशास तसं उत्तर देण्याची भाषा केली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी भाजपचे आमदार खासदार ठिय्या मांडून बसले आहेत.
या सर्व राड्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांच्यासह प्रकाश मेहता, राम कदमही सहभागी झाली आहेत.
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या रावणाच्या दहनाचा कार्यक्रम किरीट सोमय्यांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घुसून धुडगूस घातला. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आनंद म्हाब्दी यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
भारतीय जनता पक्ष किरीट सोमय्या यांच्या सोबत असून, शिवसेनेने केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो, असे भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
सांगली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
